मूळव्याध म्हणजे काय ? मूळव्याध हा सामान्य आजार आहे . Piles म्हणजे संडासाच्या जागेवर होणारी गाठ. गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात.
मूळव्याध लक्षणे (Piles Symptoms / hemorrhoids symptoms)
- संडास कडक होणे.
- संडास साफ न होणे
- संडासाच्या जागी रक्त येणे
- संडासाच्या जागी जळ जळ होणे
Piles कुणा कुणाला होऊ शकतो ?
Piles सर्वसामान्य पणे पुरुष व स्त्रियांमध्ये , दोघांमध्ये होऊ शकतो .
Piles होऊ नये ह्याच्यासाठी काय करावे ? (how to prevent piles) :
- आहारा मध्ये पाण्याचा समावेश जास्त असला पाहिजे.
- दिवसभरामध्ये साधारणतः ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे
मुळव्याध आहार काय घ्यावा :
आहारामध्ये सलाड भरपूर घेणं आवश्यक असते (high fiber food), दुपारी आणि रात्री नियमित पणाने सलाड चे सेवन केल तर piles चा त्रास कमी होतो आणि पुढे piles होण्याची शक्यता पण कमी होते.
ज्यांना piles आहे त्यांनी तेलकट , तिखट , मसालेदार पदार्थ कमी करावेत. आपल्या आहाराची वेळ एकदम शिस्तीत ठेवली पाहिजे.
मूळव्याध उपचार ( Piles Treatment ) :
Piles झालेल्या patients ना घाबरण्याची गरज नसते , औषोधोपचाराने नियंत्रणात आणू शकतो . ज्याच्यात Piles serious आहे त्यांना sclerotherapy, banding therapy stapling therapy, टाके घालून किव्हा laser for piles करू शकतो . Laser treatment चे फायदे बरेचसे आहेत आणि treatment ने patient ची recovery पण लवकर होते.